शेती ही कोणत्याही राष्ट्राचा, विशेषतः मानवी संस्कृतीचा कणा आहे. जगाची लोकसंख्या वाढत असताना अन्न पुरवठ्याची मागणी आणि विविध क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांमध्येही वाढ झाली आहे. कृषी विज्ञान शाखेत पदवी (बीएससी कृषी) मिळवल्याने विद्यार्थ्यांना कृषी उद्योगातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी व्यावहारिक कौशल्यांसह कृषी विज्ञानाचे सखोल ज्ञान शिकण्यास मदत होऊ शकते.भारता सारख्या कृषि प्रधान देशात कृषी विषयातील बी.एससी. ही पदवी घेतल्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या करिअर संधी चा फायदा होऊ शकतो. तसेच स्वयंरोजगारातही चांगली संधी मिळू शकते .
कृषि पदवी BScAgri घेऊन बाहेर पडणारे आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये असलेली मागणी यांचे प्रमाण नेहमी व्यस्त राहीले आहे. त्यामुळे कृषि पदवीधर बेरोजगार सापडणे मुश्कील आहे. विविध राज्य व केंद्र प्रशासकिय सेवांमध्ये कृषि पदवीधारकांचा वाटा नेहमीच मोलाचा राहिला आहे. कृषि पदवी शिक्षण पुर्ण केल्यास खालील प्रमाणे करीअर च्या संधी उपलब्ध आहेत.
सरकारी सेवा क्षेत्रामध्ये
केंद्र शासनात केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) व्दारे आयोजित होणाऱ्या परिक्षांमध्ये विशेष सेवा अधिकारी होता येते. या परिक्षेसाठी कृषि हा विषय मुख्य परिक्षेसाठी निवडता येतो. कृषि पदवीमध्ये BScAgri असलेला अभ्यासक्रमाचा फायदा केंद्रिय वन सेवा सारख्या परिक्षा उतिर्ण होण्यासाठी होतो. राज्य शासनात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) व्दारे आयोजित होणाऱ्या सर्व परिक्षांमध्ये पुर्व व मुख्य परिक्षेत कृषि पदवीमध्ये असलेला अभ्यासक्रमाचा फायदा परिक्षा उतिर्ण होण्यासाठी होतो. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) व्दारे आयोजित महाराष्ट्र कृषि सेवा सरळसेवा परिक्षेतुन वर्ग १ व २ अधिकारी होता येते.त्याचप्रमाणे कृषि सहाय्यक पदासाठी शासन वेगळी परीक्षा आयोजित करते.राज्य वनसेवा परिक्षेचा अभ्यासक्रम कृषि पदवीधारकांसाठी सोपा जात असल्याने या सेवांमध्ये निवड होणाऱ्यांमध्ये बहुतांशी कृषि पदवीधर असतात.
कृषि विद्यापीठ ,कृषि विज्ञान केंद्र ,विविध संशोधन केंद्र यामध्ये वैज्ञानिक ,सहयोगी,विषय विशेषज्ञ म्हणुन काम करता येते. पदवित्तर पदवी, पी.एच.डी. किंवा नेट सारखी परीक्षा देऊन कृषि महाविद्यालय व विद्यापीठामध्ये प्राध्यापक होता येते.
राज्य शासन पहिली पासुन कृषि विषययाचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये करणार असल्यामुळे भविष्यात खुप मोठया संधी निर्माण होणार आहेत.
बँकिंग आणि विमा क्षेत्र –
बँकिंग व विमा उद्योगात, विशेषतः कृषी वित्त आणि ग्रामीण विकासाशी संबंधित भूमिकांमध्ये, कृषी पदवीधारकास BScAgri खुप मोठा वाव आहे. पदवीधरांना शासकिय व खाजगी बँक मध्ये अधिकारी पदाच्या नोकरीच्या संधी आहेत.बँक प्रोबेशनरी ऑफिसर,कृषी क्षेत्र अधिकारी, ग्रामीण विकास अधिकारी आणि कनिष्ठ कृषी सहयोगी या पदांसह इतर पदांच्या संधी मिळू शकतात, जिथे ते शेतकऱ्यांना विमा, कर्ज आणि इतर आर्थिक उत्पादने मिळविण्यास मदत करू शकतात.ग्रामिण बँक व नाबार्ड मध्ये मोठया प्रमाणावर अधिकारी पदासाठी जागा उपजब्ध होतात.
खाजगी क्षेत्रामध्ये –
शेतकऱ्यांना वस्तु व सेवा पुरविणाऱ्या राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यांची संख्या खुप मोठी आहे.खत ,बी-बियाणे ,औषधी , यंत्र –औजारे यांमध्ये व्यवस्थापन ,प्रोसेसिंग , गुणवत्ता नियंत्रण,मार्केटींग यामध्ये प्रचंडप्रमाणात कृषि पदविधारकांची गरज असते. वाढत्या अनुभवासोबत पद व जबाबदारी यांमध्ये वाढ होते . अश्या अनुभवी व्यवस्थापकास आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठया पदावर काम करण्याची संधी मिळते. प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया उद्योगांसाठी व्यवस्थापन करण्याची संधी आहेत.
स्वयंरोजगार ,उद्योग
शेती व शेतीपुरक व्यावसायाचे तांत्रिक ज्ञान मिळते त्यामुळे व्यावसाय करण्यासाठीचा आत्मविशास येतो.शेतामध्ये उत्पादित होणाऱ्या मालावर प्राथमिक व व्दितीय प्रक्रिया उद्योग उभारता येतो. यातुन उत्पादित मालाची मुल्यसाखळी निर्माण करुन मुल्यवर्धन करता येते.ग्रामिण भागामध्ये रोपांची नर्सरी कृषि सेवा केंद्र,औजार बँक,सविधा केंद्र सुरु करुन शेतकऱ्यांना वस्तु व सेवांचा पुरवठा करु शकतो. उत्पादित होणाऱ्या मालाचा दर्जा चांगला राखला तर मालाची निर्यात करु शकतो किंवा समाजातील श्रीमंत महत्वाच्या व्यक्तिंना अधिक भावाने विकु शकतो.
शेतकऱ्यांचा गट,शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन मोठा उद्योग ,साठवन प्रक्रिया युनिट,सुरु करु शकतो. या साठी बँक व शासनाकडुन 50 ते 60 टक्के पर्यंत अनुदान मिळते.
फलोत्पादन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आणि कृषी-आधारित उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणात उद्योगाच्या संधी आहेत.कृषि व्यवस्थापनाचा पदवीत्तर पदवी अभ्यासक्रम पुर्ण करुन याचे तांत्रिक ज्ञान वाढवु शकतो.
शेती मध्ये नवीन पिक पध्दती,निर्यात व प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी कृषि सल्लागारांची मदत होते. अश्या अनुभवी सल्लागार यांची मागणी खुप आहे.
पुढील शिक्षणाच्या संधी
M.Sc. Agriculture, MBA in Agri-Business Management
PG डिप्लोमा इन अॅग्रिकल्चर एक्स्टेन्शन, Food Processing
विदेशी शिक्षण व स्कॉलरशिप संधी
🔚 निष्कर्ष
कृषी पदवी ही फक्त शेतीपुरती मर्यादित नसून एक व्यापक, व्यावसायिक आणि उद्योजकीय दृष्टी देणारी दिशा आहे. सार्वजनिक सेवा, बँकिंग, खाजगी क्षेत्र, उद्योग किंवा स्वतःचा व्यवसाय – सगळीकडे कृषि पदवीधारकांसाठी दारं उघडी आहेत.