जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोक्रा पहिला टप्पा यशस्वी राबविला गेल्या नंतर दुसरा टप्याची घोषणा 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निणर्याने केली गेली.मराठवाडा , विदर्भ खान्देश मधील जळगाव व नाशिक अश्या एकुण 21 जिल्हयातील 6959 गावांचा सामावेश करण्यात आला आहे.या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये सुक्ष्मनियोजन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सुक्ष्मनियोजन प्रक्रिया म्हणजे गावामध्ये लोकांच्या सहभागातुन गावाच्या परिस्थितीचा अभ्यास करुन या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणारे घटक प्रस्तावित करुन त्याच्या अंमलबजावणिचा अराखडा तय्यार करणे.पुढील 6 वर्ष निवडलेल्या गावांमध्ये खालील वैयक्तिक व सामुदायिक लाभाचे घटक राबविण्यात येणार आहेत.
प्रकल्पात निवडण्यात आलेली जिल्हा निहाय गाव संख्या
जिल्हा- गावे संख्या
अकोला-१४९
अमरावती-४५४
बीड-३०१
भंडारा-२९१
बुलडाणा-३१०
चंद्रपूर-५६१
छत्रपती संभाजीनगर-२९६
धाराशिव-१३८
गडचिरोली-५३२
गोंदिया-२९३
हिंगोली-१४८
जळगाव-३१९
जालना-177
लातूर-२१६
नागपूर-५६३
नांदेड-३७५
नाशिक-५३२
परभणी-१७३
वर्धा-३८३
वाशिम-१८९
यवतमाळ-५५९
- महाविस्तार AI मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल?
- खरीप 2025-26 साठी MSP वाढ – शेतकऱ्यांना आर्थिक हमीचा मजबूत आधार
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत लाभाचे घटक होणार सुरु
- महाविस्तार AI ॲप कसे वापरावे? स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन
- कृषि पदवी शिक्षणात करीअर च्या विविध संधी
निवडलेल्या गावांची संख्या – एकूण ६९५९
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2: उद्देश
- हवामान बदलास जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व त्यासाठी आधुनिक तंत्रांचा अवलंब
- करून संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे.
- शेतीतील उत्पादकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे.
- पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी उपाययोजना करणे.
- जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती पद्धती व इतर उपायांचा अवलंब करणे.
- शेतीमधून होणारे कर्ब उत्सर्जन कमी करणे आणि जमिनीतील कर्ब ग्रहण वाढविणे.
- कृषी मालाची मूल्यसाखळी बळकट करणे.
- हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी विविध संशोधन संस्थांबरोबर भागीदारी करणे.
प्रकल्पातील घटक व उपघटक

- उत्पादकता वृद्धीसाठी संसाधनांचा कार्यक्षम वापर
- काटेकोर शेती पद्धतीद्वारे कर्ब उत्सर्जन कमी करणे
- शेतीतील किफायतशीरपणा वाढविण्याचे उपाय
- संस्थात्मक बांधणी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम
प्रकल्पातील वैयक्तिक व सामुदायिक लाभाचे घटक
मृद व जलसंधारण आणि पुनर्भरण उपचार-100 टक्के अनुदान
१. क्षेत्र उपचार
अ. शेत बांध बंदिस्ती
आ. ढाळीचे बांध
इ. सलग समतल चर
ई. खोल सलग समपातळी चर
२. ओघळीवरील उपचार
अ. अनघड दगडी बांध
आ. लहान मातीचे बांध (अर्दन स्टक्चर)
इ. गॅबियन बंधारा/ संयुक्त गॅबियन बंधारा
ई. माती नाला बांध
उ. सिमेंट नाला बांध
३. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन
अ. सिमेंट नाला बांध दुरुस्ती
आ. नाला खोलीकरण
४. भूजल पुनर्भरण
अ. पुनर्भरण शाफ्ट
No schema found.आ. पुनर्भरण चरासह पुनर्भरण शाफ्ट
वैयक्तिक लाभाचे घटक- 5 हे जमीनधारकांसाठी 75 ते 100 टक्के अनुदान तत्वावर
- पुनर्भरण, जलसंचय व कार्यक्षम वापर-
विहीर पुनर्भरण, शेततळे, शेततळे अस्तरीकरण,नवीन विहीर, विद्युत मोटार ,पाईप,ठिबक सिंचन,तुषार सिंचन
- जमिनीचे आरोग्य वृद्धी व कर्बग्रहण–
फळबाग लागवड ,वृक्षलागवड ,बांबू लागवड, जीवाणू खत निर्मिती,गांडूळ खत नाडेप खत निर्मिती,सेंद्रिय खत निर्मिती, संवर्धित शेती
3.व्यापारी शेती कृषिपूरक उद्योग-
शेडनेट, पॉलीहाऊस, बिजोत्पादन,शेळीपालन,रेशीम उद्योग,मधुमक्षिका पालन,गोड्या पाण्यातील, मत्स्यपालन,परसातील कुक्कुटपालन,
प्रकल्पांतर्गत सहाय्यित कृषी व्यवसाय– सामुदायिक लाभाचे घटक-शेतकरी गट /महिला गट/शेतकरी उत्पादक कंपनी-60 टक्के अनुदान
अ) काढणी पश्चात / प्रक्रिया केंद्र
अन्न प्रक्रिया यनिट,एकात्मिक पॅक हाऊस / कृषि उत्पादनाचे संकलन केंद्र,कडधान्य मिल (दाल मिल),दूध प्रक्रिया यूनिट,धान्य प्रक्रिया युनिट (स्वच्छता प्रतवारी युनिटसह),पल्वेरायझर मशीन युनिट,भाजीपाला, फळ प्रक्रिया केंद्र , मसाले यनिट,हळद प्रक्रिया युनिट इतर (आटा पॅकिंग युनिट आले प्रक्रिया युनिट, चिंच प्रक्रिया युनिट, पापड उद्योग, पॅक हाऊस निर्मिती, फळ पिकवणी केंद्र, बटाटा प्रक्रिया युनिट, मका प्रक्रिया केंद्र, शीतगृह, सोया मिल्क प्रोसेसिंग युनिट. स्वयंचलित आटा चक्की)
ब) गोदाम साठवणुक केंद्र
बीजप्रक्रिया युनिट ,कांदा चाळ ,गोदाम व छोटे वेअर हाऊस,बियाणे प्रक्रिया उपकरणे ,बियाणे प्रक्रिया शेड/सुकवणी यार्ड,बियाण्यांची साठवण, गोदाम, संपूर्ण बीजप्रक्रिया युनिट (संयंत्रे, गोडाऊन शेड सह)
- इतर कृषि व्यवसाय
औषधी सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट,कृषी इनपुट सेल (बियाणे, खते आणि कीटकनाशके इ. गांडूळ खत युनिट,जिरेंनिअम तेल प्रक्रिया युनिट,तेल गाळप युनिट,निंबोळी अर्क युनिट, पशुखाद्य प्रक्रिया युनिट, मार्केट आऊटलेट (वातानुकूलित) कृषी मॉल,मुरघास युनिट, रेफ्रिजरेटेड व्हॅन किंवा भाजीपाला फळे वाहतुकीसाठी वाहन वाहन, रेशीम उद्योग, वजन काटा,शेळी पैदास केंद्र इतर (ऑक्शन शेड रोपवाटिका शेती. सेंद्रिय कृषी इनपुट, सोलार चरखा यूनिट)
ड) भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्रांची निर्मिती करणे
भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्रांची निर्मिती करणे
निवडलेल्या गावामध्ये कधी होईल योजना सुरु ?
साधारण जुलै महिन्यात सूक्ष्मनियोजन प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे . सूक्ष्मनियोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आराखडे मंजूर होऊन १ ऑगस्ट पासून वयक्तिक व सामुदायिक लाभाच्या घटकाचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होऊ शकते असे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
प्रकल्पाची वेबसाइट – https://mahapocra.gov.in
अर्ज करण्यासाठी – https://dbt.mahapocra.gov.in