माझा शेती संकल्प 2025 – खरीप हंगामातील नियोजन स्पर्धा

तिफण फाउंडेशन आणि ग्रामसेतू अ‍ॅप यांच्या संयुक्त विद्यमाने “माझा शेती संकल्प 2025” ही खरीप हंगामातील नियोजनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमार्फत शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक शेती पद्धतींचा अवलंब, आणि सामाजिक माध्यमांवर शेतीविषयक विचारांची देवाणघेवाण वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना आपले ज्ञान व कौशल्य विकसित करण्याबरोबरच उत्तम पारितोषिकेही मिळण्याची संधी आहे.

स्पर्धेचा उद्देश

या स्पर्धेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी योग्य नियोजन, पूरक पीक, खत व्यवस्थापन, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीडनियंत्रण अशा बाबींबाबत मार्गदर्शन करणे आणि त्यांची कार्यपद्धती सोशल मीडियावर शेअर करून प्रेरणा देणे हा आहे. तसेच, शेतकऱ्यांनी एकमेकांकडून शिकावे आणि पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक आणि नैसर्गिक शेतीकडे वळावे हा उद्देश देखील आहे.

स्पर्धेचा कालावधी

  • स्पर्धा सुरूवात: १८ एप्रिल २०२५
  • नोंदणीची अंतिम तारीख: १५ जून २०२५
  • ३ कृतींचे फोटो अपलोड करण्याची अंतिम तारीख: १५ जुलै २०२५
  • क्षेत्रीय पाहणी व अंतिम निकाली प्रक्रिया: १६ जुलै ते २५ जुलै २०२५
  • विजेते जाहीर करण्याची तारीख: २५ जुलै २०२५

सहभाग कसा घ्यायचा?

  • ग्रामसेतू अ‍ॅप डाउनलोड करा.
  • अ‍ॅपमध्ये नोंदणी करा (नाव, मोबाईल नंबर व आवश्यक माहिती भरा).
  • ‘+’ बटणावर क्लिक करून आपला शेती संकल्प लिहा.
  • आपल्या खरीप नियोजनाचे मुद्दे लिहा (उदा. कोणते पीक, कोणते खत, कोणती तंत्रे वापरणार?).
  • पोस्ट सबमिट करा.
  • नियोजनातील किमान ३ गोष्टी प्रत्यक्षात अमलात आणा.
  • त्या गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ (जर शक्य असेल तर) आपल्या पोस्टमध्ये अपडेट करा.

काय लिहायचे?

शेतकऱ्यांनी आपल्या खरीप नियोजनामध्ये पुढील मुद्दे विचारात घ्यायचे आहेत:

  • माती परीक्षण करून खत व्यवस्थापन
  • जैविक पद्धतींचा वापर (शेणखत, कंपोस्ट, बायोचार, जीवामृत, दशपर्णी अर्क)
  • आंतरपीक, मिश्रपीक आणि जैवविविधता वाढवणे
  • उत्पादन खर्च कमी करणारे उपाय
  • IoT, GIS अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
  • नैसर्गिक कीड व रोग व्यवस्थापन
  • रासायनिक खतांचा मर्यादित वापर

काय टाळायचे?

  • ❌ मजुरांवर अन्याय करणाऱ्या पद्धतींचा संकल्प करू नये (मजुरांचे हक्क जपावेत).
  • ❌ विना प्रशिक्षण आधुनिक यंत्रसामग्री वापरण्याचा संकल्प करू नये.
  • ❌ बिनधास्त कर्ज घेऊन अवाजवी खर्च वाढवण्याचा संकल्प करू नये.
  • ❌ शेतीतील अपयशासाठी सतत हवामानाला किंवा नशिबाला दोष देण्याचा संकल्प करू नये;
  • नियोजनावर भर द्यावा.
  • ❌ शाश्वत शेतीचे तत्त्व दुर्लक्षित करण्याचा संकल्प करू नये.
  • ❌ इतर शेतकऱ्यांशी द्वेषभावनेने वागण्याचा संकल्प करू नये; ज्ञानाची देवाण-घेवाण करावी.
  • ❌ स्वतःचा शेती अनुभव न वाढवता केवळ जुन्या पद्धतींचा आग्रह धरण्याचा संकल्प करू नये.
  • ❌ ऑनलाईन माध्यमांपासून दूर राहण्याचा संकल्प करू नये.
  • ❌ मातीची झीज करणाऱ्या नांगरणी पद्धती सतत वापरण्याचा संकल्प करू नये.
  • ❌ सेंद्रिय आणि नैसर्गिक पर्यायांचा अव्हेर करण्याचा संकल्प करू नये.

मूल्यांकन पद्धत

  • लाईक्सवर आधारित गुण: १ लाईक = १ गुण (कमाल ३५ गुण )
  • इतरांना आमंत्रण देणे (१ आमंत्रण = १ गुण; कमाल ५ गुण)
  • इतरांनी शेती संकल्प लिहिल्यास: प्रत्येकी ५ गुण (कमाल २५ गुण)
  • अमलात आणलेल्या ३ कृतीचे फोटो अपलोड: प्रत्येकी १० गुण (कमाल ३० गुण)
  • व्हिडिओ लिंक दिल्यास: ५ गुण

एकूण गुणांची कमाल मर्यादा: १०० गुण

विजेत्यांची निवड प्रक्रिया

  • अ‍ॅपमध्ये मिळालेल्या लाईक्स, आमंत्रणे, फोटो व व्हिडिओवर आधारित प्राथमिक गुणांकन.
  • क्षेत्रीय समन्वयकांकडून शेतात जाऊन सत्यापन.
  • खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास स्पर्धेतून बाद.
  • अंतिम विजेते २५ जुलै २०२५ रोजी जाहीर.

पारितोषिके

राज्यस्तरीय पारितोषिके

🥇 प्रथम क्रमांक: ₹10,000 + प्रमाणपत्र + ट्रॉफी + सोशल मीडिया प्रमोशन
🥈 द्वितीय क्रमांक: ₹7,000 + प्रमाणपत्र + ट्रॉफी + सोशल मीडिया प्रमोशन
🥉 तृतीय क्रमांक: ₹5,000 + प्रमाणपत्र + ट्रॉफी + सोशल मीडिया प्रमोशन

जिल्हास्तरीय पारितोषिके

प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी.

कृषी सहाय्यकांना संधी

एका गावातून ३४ पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभागी झाल्यास त्या गावातील कृषी सहाय्यकांना देखील पुरस्काराची संधी.

सहभागाचे फायदे

✅रासायनिक वापर कमी करून नैसर्गिक शेतीला चालना मिळेल.
✅ शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयक जागरूकता वाढेल.
✅ सोशल मीडियावर आपल्या शेतीचा प्रचार होईल.
✅ एकत्रितपणे चांगल्या शेती पद्धतींची देवाणघेवाण होईल.
✅ उत्पादन वाढीचा आणि खर्च नियंत्रणाचा मार्ग मिळेल.
✅ यशस्वी नियोजनाचे मॉडेल शासकीय/अशासकीय संस्थांना उपलब्ध होईल.
✅ विजेत्यांना पुढील स्पर्धा, वेबिनार्समध्ये स्पीकर म्हणून सहभागी होता येईल.

सविस्तर गाईडलाईन

Leave a Reply

माझा शेती संकल्प 2025 – खरीप हंगामातील नियोजन स्पर्धा

You are currently viewing माझा शेती संकल्प 2025 – खरीप हंगामातील नियोजन स्पर्धा
  • Post category:Scheme
  • Post comments:0 Comments
  • Reading time:5 mins read
  • Post author:
  • Post last modified:01/06/2025