महाराष्ट्राने शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९’ (MahaAgri-AI Policy) ला नुकतीच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, या धोरणामुळे राज्यातील शेती क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून शाश्वत आणि शेतकरी-केंद्रित बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र डिजिटल शेतीत देशात अग्रेसर ठरेल, अशी अपेक्षा आहे. या ब्लॉगमध्ये या धोरणाची वैशिष्ट्ये, फायदे आणि परिणाम याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येत आहे.
प्रमुख उद्दिष्टे
शाश्वत शेती प्रणाली: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत आणि विस्तारयोग्य शेती प्रणाली विकसित करणे.
नाविन्य आणि संशोधनाला चालना: डेटा देवाण-घेवाण, संशोधन आणि स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन देऊन शेती क्षेत्रात नवकल्पनांना प्राधान्य देणे.
प्रमुख तंत्रज्ञानाचा वापर
या धोरणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, ज्यामुळे शेती अधिक कार्यक्षम आणि शेतकरी-केंद्रित होईल:
Artificial Intelligence (AI): शेतकऱ्यांना वैयक्तिक सल्ला आणि डेटा-आधारित निर्णय घेण्यासाठी.
Generative AI: मराठीतून चॅटबॉट्स आणि व्हॉईस सहाय्यकाद्वारे माहिती पुरवठा.
Internet of Things (IoT): शेतातील सेन्सर्सद्वारे माती, हवामान आणि पिकांची माहिती संकलन.
Drones & Remote Sensing: उपग्रह आणि ड्रोनद्वारे पीक सर्वेक्षण आणि विश्लेषण.
Computer Vision: पिकांचे रोग आणि कीड ओळखण्यासाठी.
Robotics: शेतीतील कामे स्वयंचलित करणे.
Predictive Analytics: हवामान अंदाज आणि पीक उत्पादनाचा अंदाज लावणे.
संबंधित योजना / प्लॅटफॉर्म्स
हे धोरण राज्यातील विद्यमान डिजिटल शेती उपक्रमांना पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल:
MahaAgriTech: शेती तंत्रज्ञानाचा विस्तार.
AgriStack: शेतकरी आणि जमिनीचा डेटा संकलन.
MahaVedh: हवामान आणि पीक माहिती विश्लेषण.
CropSAP: पीक संरक्षणासाठी डेटा-आधारित सल्ला.
Agmarknet: बाजारभाव माहिती.
Digital ShetiShala: शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण.
Maha-DBT: शासकीय योजनांचे थेट लाभ हस्तांतरण.
डिजिटल पायाभूत सुविधा
A-DeX (Agricultural Data Exchange): क्लाऊड-आधारित डेटा एक्स्चेंजद्वारे शेतकरी, जमीन, पीक, हवामान आणि मृदा माहिती संकलन.
Sandbox for Innovation: नवकल्पनांसाठी सुरक्षित डेटा शेअरिंग आणि चाचणी वातावरण.
राज्यव्यापी डेटा एकत्रीकरण: AgriStack, MahaVedh, CropSAP यांसारख्या प्लॅटफॉर्म्सशी जोडणी.
सुरक्षित डेटा शेअरिंग: संमती-आधारित आणि सुरक्षित डेटा देवाण-घेवाण.
AI Remote Sensing & GIS आधारित विश्लेषण
ड्रोन आणि उपग्रह तंत्रज्ञान: ड्रोन, UAVs आणि उपग्रह प्रतिमांद्वारे पीक माहिती संकलन.
प्लॅटफॉर्म जोडणी: MahaVedh, FASAL, Bhuvan यांच्याशी API द्वारे एकत्रीकरण.
विविध क्षेत्रांसाठी उपयोग: जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागांना डेटा-आधारित निर्णयांसाठी मदत.
VISTAAR उपक्रम
मराठीतून AI सल्ला: AI चॅटबॉट्स आणि व्हॉईस सहाय्यकाद्वारे शेतकऱ्यांना मराठीत माहिती.
वैशिष्ट्ये: पीक सल्ला, रोग-कीड व्यवस्थापन, हवामान अंदाज, बाजारभाव आणि शासकीय योजनांची माहिती.
प्रशिक्षण: क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी AI वापराबाबत प्रशिक्षण.
राष्ट्रीय जोडणी: Agristack आणि Bhashini यांसारख्या राष्ट्रीय प्लॅटफॉर्मशी एकत्रीकरण.
Traceability व Certification प्लॅटफॉर्म
Blockchain आणि QR-Code आधारित पारदर्शक पुरवठा साखळी
उत्पादनापासून ग्राहकापर्यंत माहिती ट्रॅकिंग
आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता (APEDA, EU Farm-to-Fork)
प्रशिक्षण व इनक्युबेशन
IT/IISc मार्गदर्शनाखाली ४ कृषि विद्यापीठांत इनक्युबेशन केंद्र
कृषी अधिकारी, FPOs, शेतकरी यांना प्रशिक्षण
शेतकऱ्यांच्या गरजेनुसार टूलकिट्स व डिजिटल साधने
Global AI Agriculture Summit
दरवर्षी जागतिक परिषद व गुंतवणूकदार शिखर संमेलन
स्थानिक व आंतरराष्ट्रीय भागीदारी
नवीन तंत्रज्ञान सादरीकरण, प्रत्यक्ष अनुभव
धोरणाचा परिणाम
✅ शेतकरी-केंद्रित AI सल्ला
✅ स्टार्टअप्सना प्रोत्साहन
✅ संशोधनाला चालना
✅ निर्यातक्षम गुणवत्तेची हमी
✅ महाराष्ट्र – देशात ‘डिजिटल कृषि’ मध्ये अग्रेसर!